ओतुरचं जग (दीपावली दिवाळी २००६)
अनिल अवचट
ओतूरला दुष्काळ पडतो का?
त्या काळात मला कधीही नदी आटलेली आठवत नाही. बारा महिने वाहणारी नदी होती. आमच्या आडाचं पाणी आटल्याचं आठवत नाही. पण तरीही दुष्काळाची एक आठवतेय घटना, आमच्याच घरात पाहिलेली. सकाळी उठून आम्ही खाली आलो, तर आजी, वडील, आई बोलत उभे. काय झालं? चोरी झाली. चोर मागच्या भिंतीवरून उडी मारून आले. आणि काय चोरलं? तर रात्रीचं उरलेलं जेवण जेवून गेले!
ते इतके सभ्य की जाताना ते ताट-वाटी घासून गेले होते. भिंतीच्या कडेला उभी दोन पितळेची कल्हईची ताटं मला आजही आठवतात.
आजी म्हणत होती, उपाशी होती गं माणसं. मला माहीत असतं तर आणखी ठेवलं असतं अन्न.
असा जमाना, जिथे चोर होते सभ्य.