Monday, March 3, 2014

अथेना

अथेनाच्यात मी मला का शोधते? मला खरंच तिथे पोचायचं आहे का?
आयुष्याचं समर्थन, समरसून जगणं, एवढ्यासाठी असेल तर, हो मला तिथे पोचायचं आहे. मी का आहे, मी जे जे करू शकते ते सगळं काय आहे, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. कोणते आनंद मी मिळवू शकते, कोणत्या शक्ती मी अनुभवू शकते, कोणती दु:खं मी सहन करू शकते, जीवनाला मी किती समजू शकते, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. त्याचे मार्ग मी शोधते आहे. ज्ञात असलेल्या गोष्टींच्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्यासाठी.
साचे मोडून नव्या गोष्टी करत, त्या करून, त्यामागची प्रेरणा समजून घेत मोठे व्हावेसे वाटते. स्वतःच्या जवळ जाण्याच्या या वाटेत मी अगम्य होत जाते काही वेळा. अनेक मार्ग समजून घेत, वापरून बघत, अजून तरी मीच स्वतःला पुढे नेते आहे.
आणि वाट बघते आहे माझा मार्ग नक्की होण्याची.

(अपूर्ण)