तीन वर्षांपूर्वी कवितांच्या एका ब्लॉगवरून काही कविता उतरवून घेतल्या होत्या. त्यासोबत मला आवडलेली एक समांतर अर्थाची हिंदी कविताही तिथेच नोंदवली होती.
आयुष्यात मित्र, सखा असणं कायमच मला लुभवत आलंय. खास मुलींची म्हणून जी वागण्याची रीत असते, ती माझ्यात फार कृत्रीमपणे आणावी लागते. त्यामुळे मुली माझ्या मैत्रिणी असल्या तरी जिवलग नाही होऊ शकत.
असा जिवलग होण्याचं पोटेन्शियल असणार्या कोणाची चाहूल जरी लागली, तरी मग सारं अवधान त्या पायरवाकडे लागून राहतं. 'हा तोच का?' असा अधीर प्रश्न मनात सतत उसळत राहतो.
निर्मयीचा अस्तित्त्व म्हणूनच फार अनावर करतो.
श्रेयस आणि 'रीन च्या नात्यावरून जीव ओवाळावासा वाटतो.
राधेचा, द्रौपदीचा, मीरेचा कृष्ण हुरहूर लावतो.
जीए लाभलेल्या सुनिताबाई हे सगळ्यात भाग्यवान रूप वाटतं त्यांचं.
इमरोजच्या* अमृताचा तर मत्सरही वाटतो कधीतरी.
हे असं भास-आभासाच्या सीमेवरचं नातं पहिल्यांदा आयुष्यात आलं ते 'भातुकली' (हे नाव होतं बहुतेक) या वपुंच्या कथेतून. त्यातला राजा आणि राणीचा जगावेगळा संसार आणि अंती प्रकट होणारं त्याचं खरं स्वरूप माझ्या नव्हाळीच्या वयात खासच विलक्षण वाटला होता, आपलाही असावा असं वाटायला लावणारा. कित्येक काळ तर त्या राजालाच साद घालायची सवय लागली होती.
मग जगण्याचा रेटा वाढत गेला तसा राजा पुसला गेला. पण त्याची जागा भरून काढणारं कोणीतरी आजही हवंय. गेल्या काही काळात 'इनि' भेटली. ही इनि पण थोडी मुलगीच आहे, इनि या हाकेपासून सगळ्याच्याच प्रेमात! इनि, इन्या तू मुलगा असतीस तर मी पूर्ण झाले असते गं. माझ्या आत जे रिकामपण आहे, ते मिटलं असतं. भरून निघालं असतं.
फक्त माझं असं जग असावं या अपुर्या इच्छेला अखेरपर्यंत सोबत ठेवावं लागणार का इनि?
जो पायरव ऐकू येतो त्याच्यापाठोपाठ नुसती वार्याची विफल झुळूकच का येते?
अशा तर्हेची नाती प्रत्यक्षात नाहीच असू शकत का? जिथे भावनेची कोवळीक व्यक्त करायला शब्दांचे ढीग रचण्याची गरज भासू नये. जिथे साध्या हुंकारातूनही विश्व व्यक्त व्हावं.
*स्त्री ही देहापलीकडे खूपशी शिल्लक उरते, आणि ती त्यालाच लाभते, ज्याच्यावर 'ती' लुब्ध होते. असं इमरोजनं म्हटलंय. स्त्रीचं असं लुब्ध होणं हे निव्वळ शारीर कधीच असणार नाही. तिच्या अंतर्यामी असलेल्या चेतनेला साद न घालणार्याला ती त्या चेतनेची जाणीवही होऊ द्यायची नाही.

1 comment:
Kamal lihil ahes Salaaam
Post a Comment