मिपा.
माहितीचा, आणि मनुष्यस्वभावाच्या सगळ्या नमुन्यांचा एक समुद्र.
उत्तमोत्तम लेखक, विषयांची भलीमोठी रेंज असलेले लेख, दिवसेंदिवस चालणार्या चर्चा, अभ्यासून दिलेल्या आणि टवाळकी करण्यासाठी दिलेल्या प्रतिक्रिया. सगळंच भरभरून.
म्हणून इथे वावरताना मी टोपणनाव घेतलं, असं की मी कोण, किती वयाची व्यक्ती आहे याचा अंदाज येऊ नये. म्हटलं तर माझं नावच. म्हटलं तर एक अगम्य शब्द.
लेखनाची माझी प्रकृती इथल्या वातावरणाहून थोडी वेगळी. त्यामुळे इथे अद्यापतरी लेख टाकलेला नाही. पण मनात उमटलेला प्रतिसाद मात्र नक्कीच नोंदवावासा वाटतो. तो नोंदवताना "स्वाक्षरी" हा स्वतःला किंचित का होईना व्यक्त करण्याचा सोपा मार्ग असल्याचं जाणवलं.
म्हणून मग स्वाक्षर्यांवर प्रेम जडलं. कधी कुठे वाचलेल्या ओळी वापरल्या. तर कधी स्वतःला सुचलेलं काही नोंदवलं. अशा माझ्या स्वाक्षर्यांपैकी मी रचलेल्या काही ओळी.

- तुझ्या आधी.. तुझ्या नादी.. तुझ्याही नंतर
असणे माझे नु'लगडणारे गूढ निरंतर - ...त्याचे त्याने यावे.
माझे मी भिजावे.
नकळत बीज रुजावे. - "XPeria"ncing "U"...
- मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.पण याची मला लाज वाटायला हवी असं काही जणांना का वाटतं?
Why some people attempt to make me feel ashamed of the fact that “I am a proud Indian”? - "माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..." - पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे.
प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच!
कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा..
No comments:
Post a Comment