तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस.
आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे.
हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर?
त्याच्या आयुष्याच्या कोवळ्या दिवसांपासून, अगदी तळापासूनच भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे. पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..?
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ"
"राज दंड छोड़ भूमि पर वाज
फिर काहे बाँसुरी बजाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?"
त्या तुला जीव लावणार्या नगरजनांसाठी तरी नको जाऊस रे, गेलास तर इथे कुणाला करमायचं नाही.." असं विनवून बघतेय.
"पुर नारी सारी व्याकुल नयन
कुसुम सज्जा लगे कंटक शयन
रात भर माधव जागत बेचैन"
गोकुळाची? का.. का राधेची...
मग सरतेशेवटी ती नाईलाजाने 'तिचा' उल्लेख करते. निकराने म्हणते..
..बिरहा के आँसू कब के पोंछ डाली
फिर काहे दर्द जगाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ"
पण त्याबरोबरच या पुनर्भेटीने तिची होईल ती सैरभैर अवस्थाही एक स्त्री म्हणून जाणून आहे ती.
रुक्मिणीने राधेची घातलेली ही आणच अखेर कृष्णाच्या पावलांना थांबवतेय.
रुक्मिणीच्या शब्दांतून त्याच्या हे लक्षात येऊन गेलं की, गतकाळातल्या आठवणींना 'आज'च्या क्षणांमध्ये आणून पुन्हा जगता येत नाही. जगूही नये.
-------------------------------------------------------------------
ॠतुपर्ण घोषच्या 'रेनकोट' सिनेमातलं 'मथुरा नगरपती काहे तुम..' हे गाणं गेले काही दिवस ऐकत आहे.
पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे..
तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे.आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे.
हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर?
त्याच्या आयुष्याच्या कोवळ्या दिवसांपासून, अगदी तळापासूनच भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे. पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..?
कसं रोखावं आता ह्याला? कसं सांगावं, पुन्हा नको त्या वाटांवरून चालूस?
"सुबह-सुबह का ख्याल आज
वापस गोकुल चले मथुरा राजमथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ"
मग ती त्याला राजपदाची आठवण करून देतेय.
"तू सम्राट आहेस इथला. गोपाळाचा वेष उतरवलास, डोक्यावरचं पागोटं उतरवून राजमुकुट धारण केलायस.. मग आता हातातला राजदंड बाजूला ठेवून आज बासरीवर पुन्हा "ते" सूर का काढावेसे वाटतायत रे तुला?"राज दंड छोड़ भूमि पर वाज
फिर काहे बाँसुरी बजाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?"
"कुणा विरही प्रेमिकेला पुन्हा भूल पडलीय जणू? हे राजपद व्यर्थ झालंय आज तुझ्यासाठी?
तू जाणार या विचाराने नगरजन व्याकूळ आहेत.. तुझ्या बेचैनीचं कारण ठाऊक नसूनही केवळ तू अस्वस्थ आहेस म्हणूनच.त्या तुला जीव लावणार्या नगरजनांसाठी तरी नको जाऊस रे, गेलास तर इथे कुणाला करमायचं नाही.." असं विनवून बघतेय.
"पुर नारी सारी व्याकुल नयन
कुसुम सज्जा लगे कंटक शयन
रात भर माधव जागत बेचैन"
पण छे..! काहीच पटत नाही त्याला, कालच अर्ध्या रात्री सारथ्याला घेऊन कुठेसा गेला होता.. बेचैन आहे कधीचा.
रात्रीच्या शांत घटकेत नदीच्या तीरावर जाऊन त्याचं बेचैन मन गोकुळाची चाहूल घेतंय.. गोकुळाची? का.. का राधेची...
मग सरतेशेवटी ती नाईलाजाने 'तिचा' उल्लेख करते. निकराने म्हणते..
"जिच्यासाठी तुझं मन ओढ घेतंय ती तुझी राधा आता गृहिणी झालीय, संसार आहे तिला.. तुझ्या विरहाचे अश्रू पुसून टाकलेत तिनं. का तिचं दुःख पुन्हा जिवंत करायचंय तुला? का पुन्हा गोकुळात जायचंय तुला?"
"तुम्हरी प्रिया अब पूरी घरवाली....बिरहा के आँसू कब के पोंछ डाली
फिर काहे दर्द जगाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ"
लोकविलक्षण नवऱ्याची असली तरी पत्नीच ती, आणि राधा झाली तरी शेवटी 'दुसरी'च ती!
त्यामुळे राधेबद्दल सूक्ष्मशी असूयाच आहे तिच्या मनी.पण त्याबरोबरच या पुनर्भेटीने तिची होईल ती सैरभैर अवस्थाही एक स्त्री म्हणून जाणून आहे ती.
रुक्मिणीने राधेची घातलेली ही आणच अखेर कृष्णाच्या पावलांना थांबवतेय.
या विनवण्या पोचल्या, म्हणून की काय पुन्हा कधी कृष्ण गोकुळात गेला नाही .
'तू तो मीच आहे', हे अवघड गुज जगाला समजावून सांगणार्या कृष्णाला राधेशी असलेल्या त्याच्या या द्वैतावर, या विरहावर मात्र रुक्मिणीकडून समजूत घालून घ्यावी लागली.रुक्मिणीच्या शब्दांतून त्याच्या हे लक्षात येऊन गेलं की, गतकाळातल्या आठवणींना 'आज'च्या क्षणांमध्ये आणून पुन्हा जगता येत नाही. जगूही नये.
राधा.. या नावाचा अर्थच बंधनं सोडवणारी, मोकळं करणारी. आज, आत्ताच्या क्षणाला सामोरं करणारी राधा. झाल्यागेल्या गोष्टीतल्या कडू आणि गोड अनुभवातही गुंतवून न ठेवणारी प्रगल्भ राधा.
आणि तरीही अशा त्या राधेच्याच बंधनात गुरफटलेला प्रियकर श्रीहरी.
अन् या दोघांच्या अनवट नात्याला ओळखूनही त्याला द्यायला हवा असलेला पूर्णविराम उलगडून सांगणारी सुजाण रुक्मिणी.
यांची ही सुरीली कहाणी.
ॠतुपर्ण घोषच्या 'रेनकोट' सिनेमातलं 'मथुरा नगरपती काहे तुम..' हे गाणं गेले काही दिवस ऐकत आहे.
रूढ अर्थाने हे त्या गाण्याचं रसग्रहण वगैरे नाही.
तर शुभा मुद्गलचा स्थिर, स्वच्छ अन् मृदू आवाज, नुसती साथ करण्यापुरतं साधं बॅकग्राउण्ड म्युझिक, आणि त्या शांत सुरावटींनी, आशयघन शब्दांनी अलगद दाखवून दिलेले अर्थ. इतकंच काहीसं आहे..
-------------------------------------------------------------------
1 comment:
अरे वा! क्या बात है! बढियां!!
Post a Comment